Breaking

मंगळवार, २५ नोव्हेंबर, २०२५

*जयसिंगपूर कॉलेजमध्ये NCC दिन स्वच्छता उपक्रमाच्या माध्यमातून उत्साहात संपन्न*

 

एन. सी. सी. दिनानिमित्त मार्गदर्शन करताना सुरेश सकट, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे व लेफ्टनंट  प्रा. सुशांत पाटील 

प्रा. डॉ. महावीर बुरसे : उपसंपादक 


जयसिंगपूर : येथील जयसिंगपूर कॉलेजमध्ये  एन.सी.सी. दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध व्याख्याते व व्यसनमुक्ती प्रचारक मा. सुरेश गजानन सकटे (सांगली) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कॉलेजचे  प्राचार्य डॉ.सुरत मांजरे होते.

   कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर 56 महा बटालियन NCC तर्फे NCC गान व शपथ घेतली गेली. प्रमुख पाहुणे सुरेश सकटे यांनी व्यसनामुळे व्यक्तीचे, कुटुंबाचे आणि देशाचे होणारे नुकसान स्पष्ट केले. व्यसनमुक्ती केंद्रांचे महत्त्व आणि तरुणांनी व्यसनापासून दूर राहण्याची गरज त्यांनी प्रभावी उदाहरणांसह मांडली.

   अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. मांजरे यांनी "निर्व्यसनी जीवन हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली" असे सांगत निरोगी व सशक्त व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी युवावर्गाने सदैव जागरूक राहावे असे आवाहन केले.

     एनसीसी कॅडेट्सनी स्वच्छता उपक्रमांतर्गत परिसरातील श्रमदान करून स्वच्छतेचा संदेश दिला. या कार्यक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन लेफ्टनंट सुशांत पाटील यांनी केले. तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे, सचिव डॉ. महावीर अक्कोळे व प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांचे मार्गदर्शन लाभले. अधीक्षक संजय चावरे उपस्थित होते.

 कार्यक्रमाला 56 महा बटालियन NCC, कोल्हापूर येथील कमांडिंग ऑफिसर व असिस्टंट कमांडिंग ऑफिसर यांचे विशेष मार्गदर्शनही मिळाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा