Breaking

सोमवार, २४ नोव्हेंबर, २०२५

*कसबा बावड्यात महिला पोलिसाच्या घरी घरफोडी; 13 तोळ्यांचे सोने लंपास*


 संग्रहित छायाचित्र 


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर : कसबा बावडा येथील लाईन बाजार पोलिस वसाहतीमध्ये चोरीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या घरी चोरट्यांनी हाथ साफ करत तब्बल १३ तोळ्यांचे सोन्याचे दागिने पळविल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

     स्थानिक सूत्राकडून प्राप्त झालेल्या  माहितीनुसार, महिला कर्मचारी रात्री सुमारास आठ वाजता ड्युटी संपवून घरी परतल्या. तेव्हा घराचे कुलूप उघडे दिसल्याने त्या घाबरल्या. घरात प्रवेश करून पाहिले असता लोखंडी तिजोरीचे दार देखील उघडे असल्याचे आढळले.

      घटनेची माहिती त्यांनी तातडीने वरिष्ठांना दिल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. मात्र, रात्री उशिरापर्यंत या चोरीची अधिकृत नोंद पोलिस ठाण्यात झाली नव्हती.

    पोलिस वसाहतीमध्येच झालेल्या या चोरीमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून चोरट्यांनी पोलिस वसाहतीला दिलेले हे आव्हान गंभीर मानले जात आहे. पोलिस तपास सुरू असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात येण्याची शक्यता आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा