![]() |
| संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिका पत्रिकेचे वाचन करताना प्राचार्य डॉ. सुरत मांजरे, प्राध्यापक वृंद व विद्यार्थी |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक *
जयसिंगपूर : येथील जयसिंगपूर कॉलेजमध्ये अमृत महोत्सवी संविधान दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने आयोजित साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचा प्रारंभ सामूहिकरित्या संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून करण्यात आला. उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाने विद्यार्थ्यांमध्ये संविधान मूल्यांविषयी आदर आणि जागरूकता निर्माण झाली.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. सुरत मांजरे म्हणाले,“आपले संविधान हे तमाम भारतीय जनतेचे आन, बाण आणि शान आहे. संविधानामुळे आपल्याला सर्वांसाठी समान, न्याय्य आणि कल्याणकारी जीवनव्यवस्था प्राप्त झाली आहे. संविधानाचा गौरव करणे हे प्रत्येक भारतीयाचे आद्य कर्तव्य आहे.”त्यांनी विद्यार्थ्यांना संविधानातील मूल्ये आचरणात आणण्याचे आवाहन केले.
कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. खंडेराव खळदकर यांनी संविधान निर्मितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगितली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानासह संविधान रचनेतील विविध समित्यांची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांसमोर सोप्या भाषेत मांडली. त्यांनी सांगितले की, भारताचे संविधान हे जगातील सर्वात व्यापक, लोकशाहीवादी आणि समतावादी दस्तऐवज असून ते नागरिकांच्या हक्कांसोबतच कर्तव्यांचीही जाणीव करून देणारे आहे.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रभाकर माने यांनी केले. त्यांनी संविधान दिनाचे महत्त्व आणि NSS च्या उपक्रमांची माहिती दिली.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कार्यक्रम अधिकारी प्रा. मुकुंद पारिशवाड यांनी केले.
या कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा. भारत आलदार, प्रा. डॉ. व्ही. व्ही. चौगुले, पर्यवेक्षक प्रा. डॉ. महावीर बुरसे, NCC ऑफिसर प्रा. सुशांत पाटील, प्रा. बी. ए. पाटील व अधीक्षक संजय चावरे यांच्यासह कॉलेजमधील प्राध्यापक वृंद व एनएसएस स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी संविधान मूल्यांचे जतन करण्याचा संकल्प व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा