Breaking

बुधवार, ३१ डिसेंबर, २०२५

*कै. श्री. रामकृष्ण मालू प्राथमिक प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न*

 

 पुरस्कार वितरित करताना प्रशासन अधिकारी  मेघन देसाई, डॉ.  सुदर्शन तारे, अजय शेडबाळे, अध्यक्ष राजेंद्र मालू, चंद्रकांत जाधव, प्रसन्ना कुंभोजकर, मुख्याध्यापक सयाजी पाटील व मुख्याध्यापक सुनील कोळी 


*प्रो.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : येथील दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कै. श्री. रामकृष्ण मालू प्राथमिक व श्रीमती यशोदा मालू प्रशाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण  सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कूल कमिटीचे चेअरमन राजेंद्र मालू होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रशासन अधिकारी मेघन देसाई, डॉ. सुदर्शन टारे व चार्टर्ड अकाउंटंट अजय शेडबाळे उपस्थित होते. मुख्याध्यापक सुनील कोळी यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

    मार्गदर्शन करताना मेघन देसाई म्हणाले, आजच्या आव्हानात्मक परिस्थितीतही प्रशालेने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत लक्षणीय वाढ घडवून आणली असून हे कौतुकास्पद आहे. अध्यक्षीय भाषणात राजेंद्र मालू यांनी प्रशाला विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून गुणवत्तेच्या प्रत्येक पातळीवर पोहोचण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.अजय शेडबाळे यांनी विद्यार्थ्यांच्या विकासामध्ये शिक्षकांची सर्वकष व मार्गदर्शक भूमिका अधोरेखित केली. प्रा. डॉ. प्रभाकर माने यांनी ही संस्था व प्रशाला आजच्या काळात शिक्षणाच्या गुणवत्तेचा मानबिंदू ठरण्याकडे वाटचाल करत असल्याचे नमूद केले. यावेळी प्रा.डॉ.टारे व ब्रिटनस्थित माजी विद्यार्थिनी सुप्रिया संकपाळ यांनी मनोगते व्यक्त केली.

    यावेळी बाह्य स्पर्धा परीक्षा, बाह्य क्रीडा स्पर्धा तसेच प्रशालेतील वार्षिक शैक्षणिक व क्रीडा स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व शिल्ड देऊन गौरविण्यात आले.

    कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक सुनील कोळी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय विजय सांगोले यांनी करून दिला. सूत्रसंचालन मंदाकिनी पोवार व मनीषा पाटील यांनी केले. आभार आनंदा शिंदे यांनी मानले. ओंकार देवाळे व त्रिशला भोसले यांनी पुरस्कार वितरण सोहळाचे वाचन केले.

    या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन मुख्याध्यापक सुनील कोळी व त्यांच्या सहअध्यापकांनी केले. कार्यक्रमास स्कूल कमिटीचे सदस्य चंद्रकांत जाधव, प्रसन्ना कुंभोजकर, हायस्कूलचे मुख्याध्यापक सयाजी पाटील, शिशु विद्यामंदिर चे प्रमुख संगीता घेवारी, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष प्रशांत माने,  सर्व सदस्य, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा