![]() |
| जयसिंगपूर कॉलेजमध्ये प्लास्टिक संकलन |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : येथील जयसिंगपूर कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शनिवार दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी कॉलेज कॅम्पसमध्ये व्यापक स्वरूपात प्लास्टिक संकलन मोहिम राबविण्यात आली. पर्यावरण संवर्धन व शाश्वत विकासाच्या दृष्टीने आयोजित या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मोहिमेच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी “शाश्वत विकासासाठी प्लास्टिक बंदी का आवश्यक आहे?” या विषयावर सखोल व प्रेरणादायी मार्गदर्शन केले. प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले.
यानंतर एनएसएसच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या सुमारे १० एकर परिसरात विखुरलेले प्लास्टिक कागद, रॅपर्स, प्लास्टिक बाटल्या व अन्य प्लास्टिक साहित्य गोळा करून जवळपास २३ किलो प्लास्टिक संकलित केले. या मोहिमेदरम्यान स्वयंसेवकांनी इतर विद्यार्थ्यांनाही प्रबोधन करत उपक्रमात सहभागी करून घेतले.
या उपक्रमासाठी शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. टी. एम. चौगले, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रभाकर माने, प्रा. डॉ. खंडेराव खळदकर यांचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमास प्रा. डॉ. सुपर्णा संसुद्धी, प्रा. डॉ. तुषार घाटगे, प्रा. डॉ. महावीर बुरसे, प्रा. गणेश कुरले, अधीक्षक संजय चावरे व प्राध्यापक वृंद यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.एनएसएस प्रतिनिधी अग्रजा कांबळे यांच्या उत्कृष्ट नियोजनातून हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. मोठ्या संख्येने एन.एस.एस. स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत प्लास्टिकमुक्त परिसराचा संकल्प व्यक्त केला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा