![]() |
संवेदनशील व्यक्तिमत्व,प्रख्यात साहित्यक व माजी प्राचार्य डॉ. सुभाषचंद्र अक्कोळे |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : प्रख्यात साहित्यिक, संत साहित्याचे गाढे अभ्यासक व माजी प्राचार्य कै. डॉ. सुभाषचंद्र अक्कोळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात येणारी स्मृती व्याख्यानमाला यंदाही शनिवार व रविवार, दिनांक १० व ११ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता जयसिंगपूर कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती स्थानिक आयोजन समिती व संस्थेचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शनिवार, दिनांक १० जानेवारी रोजी ह. भ. प. ज्ञानेश्वर बंडगर महाराज (सांगोला) हे ‘वारकरी संत संप्रदाय आणि समकालीन दृष्टिकोन’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. तर रविवार, दिनांक ११ जानेवारी रोजी प्रेरक वक्ते व सामाजिक कार्यकर्ते पैगंबर शेख (पुणे) हे ‘छत्रपती शिवराय ते राजर्षी शाहू – प्रवास सलोख्याचा’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती व्याख्याता निवड समितीचे प्रमुख माजी प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांनी दिली.
जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड, इचलकरंजी व सांगली परिसरातील जाणकार, जिज्ञासू श्रोते तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या वैचारिक व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. सुरज मांजरे यांनी केले. ही स्मृती व्याख्यानमाला दरवर्षी याच स्वरूपात नामवंत वक्त्यांच्या सहभागातून निरंतरपणे सुरू राहणार असल्याची माहिती अक्कोळे कुटुंबीयांच्या वतीने कल्याणी अक्कोळे यांनी दिली.
यावेळी प्रो. डॉ. प्रभाकर माने व अधीक्षक संजय चावरे उपस्थित होते. रसिक श्रोत्यांनी या वैचारिक व बौद्धिक मेजवानीचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा