![]() |
| जयसिंगपूर नगरी न्यूजचे संपादक राजू उर्फ महबूब सय्यद यांचा सत्कार करताना युवा नेते पृथ्वीराज यादव |
*शाहिद सय्यद : शिरोळ विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : शिरोळ नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा निकाल जाहीर होताच यादव आघाडीने मोठे यश संपादन केले. या यशामागे वरिष्ठ नेत्यांच्या रणनीतीबरोबरच पडद्यामागे निर्णायक भूमिका बजावणारे युवा नेते पृथ्वीराज यादव हे खरे किंगमेकर ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
निवडणुकीदरम्यान विविध आघाड्यांमध्ये समन्वय साधत, कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्याचे महत्त्वाचे काम पृथ्वीराज यादव यांनी केले. त्यांच्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळे आणि नेतृत्वगुणांमुळे यादव आघाडीला अपेक्षेपेक्षा मोठा जनादेश मिळाला.या यशानिमित्त पृथ्वीराज यादव यांचा प्रत्यक्ष भेटी घेऊन सत्कार आयोजित करण्यात येत होता. मात्र या सत्कारावेळी एक भावनिक आणि प्रेरणादायी प्रसंग अनुभवास आला. जयसिंगपूर नगरी न्युजचे संपादक-पत्रकार राजू सय्यद हे त्यांचा सत्कार करण्यासाठी उपस्थित झाले असता, उलटपक्षी पृथ्वीराज यादव यांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवत स्वतः पत्रकार राजू सय्यद यांना फेटा बांधून पेढा भरवून त्यांचा सत्कार केला.नेतृत्वासोबतच नम्रता, संवेदनशीलता आणि परस्पर सन्मान जपणारा हा गुणधर्म उपस्थितांवर विशेष छाप पाडणारा ठरला. “यश हे सामूहिक असते आणि पत्रकार समाजाचा आरसा असतात,” अशा शब्दांत पृथ्वीराज यादव यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
या प्रसंगामुळे युवा नेते पृथ्वीराज यादव यांच्या नेतृत्वाबरोबरच त्यांच्या संवेदनशील स्वभावाचे सर्वत्र कौतुक होत असून, राजकारणात माणुसकी आणि सुसंस्कृतपणा जपणारा नेता म्हणून त्यांची ओळख होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा