![]() |
| विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना लेफ्टनंट सई जाधव, मेजर संदीप जाधव, डॉ. सुभाष अडदंडे, डॉ. महावीर अक्कोळे, अथर्व पांडव व प्राचार्य डॉ. सुरत मांजरे |
*टेरिटोरियल आर्मीतील पहिल्या महिला लेफ्टनंटचा जयसिंगपूर कॉलेजतर्फे गौरव*
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : इंडियन मिलिटरी अकॅडमी, डेहराडून येथून प्रशिक्षण पूर्ण करून टेरिटोरियल आर्मीमध्ये पहिल्या महिला लेफ्टनंट पदी निवड झाल्याबद्दल लेफ्टनंट सई ज्योती संदीप जाधव हिचा जयसिंगपूर कॉलेजच्या वतीने गौरव समारंभ आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. महावीर अक्कोळे, सुनील पांडव व अथर्व पांडव उपस्थित होते.
यावेळी लेफ्टनंट सई जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना देशसेवेच्या माध्यमातून उज्ज्वल करिअर घडविता येते, असा विश्वास व्यक्त केला. लेफ्टनंट पदी निवड होईपर्यंत आलेले अनुभव कथन करताना आई-वडील व शिक्षक या गुरुजनांचे योगदान मोलाचे असल्याचे त्यांनी सांगितले.मेजर संदीप जाधव यांनी आर्मीमधील मान-सन्मानाचे स्थान अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी सैन्य सेवेत येण्याचे आवाहन केले.
अध्यक्षीय मनोगतात डॉ. सुभाष अडदंडे यांनी विद्यार्थ्यांच्या गरजा व मागणीनुसार सर्व शैक्षणिक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाही दिली. तसेच सई जाधव व त्यांच्या कुटुंबीयांच्या कार्याचा गौरव केला.
डॉ. महावीर अक्कोळे यांनी सई जाधव या जयसिंगपूरची शान-बाण असून आर्मीमध्ये महिलांचे स्थान अधिक उंचावण्याचे कार्य त्यांनी केले असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रारंभी प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रभाकर माने यांनी केले तर आभार प्रा. महेश शिंगे व प्रा. राजेंद्र कोरे यांनी मानले. या गौरव समारंभास प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा