![]() |
| जयसिंगपूर कॉलेजमध्ये शिरोळ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन |
प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : जिल्हा परिषद कोल्हापूर शिक्षण विभाग, पंचायत समिती शिरोळ व जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन दिनांक १८ व १९ डिसेंबर २०२५ रोजी जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर येथे करण्यात आले आहे.
या विज्ञान प्रदर्शनामध्ये प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी शाश्वत शेती, कचरा व्यवस्थापन व प्लास्टिकला पर्याय, हरित ऊर्जा, उदयनमुक्त तंत्रज्ञान, मनोरंजक गणितीय मॉडेलिंग, आरोग्य व स्वच्छता, जलसंवर्धन व व्यवस्थापन हे प्रमुख विषय असणार आहेत.
पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी, नववी ते बारावी अशा विविध गटांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा होणार असून माध्यमिक विभागातून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र गट ठेवण्यात आला आहे. तसेच शिक्षक व प्रयोगशाळा परिचर यांच्या गटातही विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या विज्ञान प्रदर्शनात शिरोळ तालुक्यातील सर्व शाळांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा,असे आवाहन सौ.भारती कोळी (गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती शिरोळ) दीपक कामत (विस्तार अधिकारी, शिरोळ), विज्ञान मंडळाच्या प्रमुख मा. प्राजक्ता पाटील तसेच प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी केले. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. बी. ए. आलदर व पर्यवेक्षक डॉ. महावीर बुरसे उपस्थित होते.
या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे, सचिव डॉ. महावीर अक्कोळे, पद्माकर पाटील सर्व संस्था पदाधिकारी,अधीक्षक संजय चावरे तसेच सर्व शिक्षकवृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा