Breaking

मंगळवार, १६ डिसेंबर, २०२५

शिवाजी विद्यापीठात गुरूवारी पर्यावरण शिक्षकांसाठी कार्यशाळा


 शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक


कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा पर्यावरणशास्त्र अधिविभाग आणि पर्यावरण संरक्षण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या गुरुवारी (दि. १८) महाविद्यालयातील पर्यावरण विषयाच्या अध्यापकांसाठी पर्यावरण जाणीव-जागृती एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. गणित अधिविभागाच्या सभागृहात सकाळी ११ ते ५ या वेळेत कार्यशाळा होईल. 

     कार्यशाळेला कुलसचिव डॉ. विलास शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यशाळेला अधिसभा सदस्य डॉ. मनोज पाटील, डॉ. प्रकाश राऊत (माजी विभागप्रमुख, पर्यावरणशास्त्र अधिविभाग), डॉ. श्रुती कुलकर्णी (पर्यावरण सल्लागार) तसेच डॉ. आसावरी जाधव (विभागप्रमुख, पर्यावरणशास्त्र अधिविभाग) हे तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा