जयसिंगपूर कॉलेजमध्ये ५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन
जयसिंगपूर :जिल्हा परिषद कोल्हापूर, शिक्षण विभाग पंचायत समिती शिरोळ व जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन जयसिंगपूर कॉलेजमध्ये उत्साहात पार पडले.
उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे अजय पाटील (उपशिक्षणाधिकारी, माध्यमिक, जिल्हा परिषद कोल्हापूर) यांनी विद्यार्थ्यांनी विज्ञानातून वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. विज्ञान प्रदर्शनातून सकारात्मक विचार, जिज्ञासा व नवसंशोधनाची ऊर्जा मिळते; त्यातून विचारशील विद्यार्थी व जागरूक नागरिक घडतात, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक शिरगुप्पे (स्थानिक समिती सदस्य, जयसिंगपूर कॉलेज) होते. विज्ञानामुळे अंधश्रद्धा नष्ट होतात व विद्यार्थ्यांनी सातत्याने वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारावा, असे त्यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख वक्ते डॉ. प्रशांत चिकोडे (भौतिकशास्त्र विभाग, जयसिंगपूर कॉलेज) यांनी विज्ञानातील संशोधनामुळे देश प्रगतीपथावर असून अंतराळ संशोधनातही मोठी प्रगती साधली असल्याचे स्पष्ट केले.
प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण होते व विज्ञानामुळे त्यांचा सर्वांगीण विकास घडतो, असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी श्रीशैल मठपती (उपाध्यक्ष, राज्य विज्ञान महामंडळ), दीपक कामत (शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती शिरोळ), मेघन देसाई (केंद्रप्रमुख, शिक्षण मंडळ जयसिंगपूर), नारायण घोलप (गट विकास अधिकारी तथा प्रशासक, पंचायत समिती शिरोळ), सौ. प्राजक्ता पाटील (अध्यक्ष, विज्ञान समिती शिरोळ), रमेश माळी, अनिल ओमासे, सौ. वर्षा लोकरे (शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती शिरोळ) यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सौ. भारती कोळी (गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती शिरोळ) यांनी केले. लक्ष्मीनारायण मालू हायस्कूल, जयसिंगपूरच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. आभार उपप्राचार्य प्रा. बी. ए. आलदर यांनी मानले. सूत्रसंचालन किरण पाटील व महेश गोठणे यांनी केले.
या उद्घाटन समारंभास शिरोळ तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकवर्ग, पालक, विद्यार्थी तसेच प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करणारा
उत्तर द्याहटवाप्रेरणादायी उपक्रम.