![]() |
| भितीपत्र उद्घाटन करताना प्रा. डॉ. विजयमाला चौगुले व डॉ. महावीर बुरसे व अन्य मान्यवर |
*शाहिद सय्यद : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : येथील जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर मध्ये दिनांक १७ डिसेंबर २०२५ रोजी अर्थशास्त्र विभागात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या विचारांचे स्मरण व प्रचार–प्रसार करण्याच्या उद्देशाने भित्तिपत्रक उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आली. प्रा. गणेश कुरले यांनी कार्यक्रमातील उपस्थित पाहुण्यांचा व मान्यवरांचा परिचय करून दिला.
या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून प्रा. डॉ. विजयमाला चौगुले (मानव्य विद्याशाखा प्रमुख) उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्थशास्त्रातील अमूल्य योगदान, आर्थिक विषमता, सामाजिक न्याय, श्रमिकांचे हक्क, सार्वजनिक अर्थकारण तसेच संविधान निर्मितीमधील त्यांची भूमिका यावर सविस्तर प्रकाश टाकला. डॉ.बाबासाहेबांचे विचार आजच्या तरुण पिढीसाठी किती प्रेरणादायी व मार्गदर्शक आहेत, हे त्यांनी प्रभावी शब्दांत स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. महावीर बुरसे (पर्यवेक्षक, ज्युनियर कॉलेज) हे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक, सामाजिक व वैयक्तिक जीवनात अंगीकार करावा, असे आवाहन केले. शिक्षण, समता आणि बंधुता या मूल्यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रभाकर माने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.आभार डॉ. वंदना देवकर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विश्रांती माने यांनी केले.
प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांची प्रेरणा, मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
याप्रसंगी प्रा. डॉ. खंडेराव खळदकर, प्रा. सुरज चौगुले यांनी मनोगत व्यक्त केली. प्रा. मेहबूब मुजावर, प्रा. ज्योती चोपडे आदी प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी तयार केलेली भित्तिपत्रके बाबासाहेबांच्या विचारांचे प्रभावी दर्शन घडवणारी ठरली.
कार्यक्रमाचा समारोप डॉ. आंबेडकर यांच्या विचारांना कृतीत उतरवण्याचा संकल्प करून करण्यात आला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा