![]() |
| व्याख्यानमालेत मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. राजेंद्र कुंभार, अध्यक्षस्थानी अशोक शिरगुप्पे, डॉ. महावीर अक्कोळेव प्राचार्य डॉ. मांजरे व डॉ. खंडेराव खळदकर |
प्रा. डॉ. महावीर बुरसे : उपसंपादक
जयसिंगपूर : सामाजिक व आर्थिक समतेची क्रांती ही सामाजिक समता, वैज्ञानिक दृष्टिकोन, समाजवाद व धर्मनिरपेक्षतेच्या आधारावरच घडू शकते. संविधान, लोकशाही मूल्ये आणि सामूहिक उद्दिष्टे ही राष्ट्राच्या एकतेची बलस्थाने असून समताधिष्ठित समाज निर्मिती हीच सक्षम राष्ट्राची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन प्रा. डॉ. राजेंद्र कुंभार यांनी केले.
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कै. कासुबाई यलबाजी ममता तुकाराम मंगल स्मृती व्याख्यानमालेत ते ‘सामाजिक समता व राष्ट्रीय एकता’ या विषयावर बोलत होते. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा मागोवा घेत सामाजिक समतेची अनेक उदाहरणे देत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मनोगतात अशोक शिरगुप्पे यांनी, सामाजिक समतेचा पाया मजबूत झाल्याशिवाय राष्ट्रीय एकतेची इमारत भक्कम होऊ शकत नाही, असे सांगून समतावादी विचारांचा पुरस्कार केला.
कार्यक्रमास संस्थेचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे, IQAC समन्वयक प्रा. डॉ. तुषार घाटगे, प्रा. डॉ. एस. एस. महाजन, प्रा. डॉ. विजयमाला चौगुले, डॉ. एस. आर. नकाते, उपप्राचार्य प्रा. भारत आलदर, पर्यवेक्षक डॉ. महावीर बुरसे, अधीक्षक संजय चावरे तसेच विलिंग्डन कॉलेजचे प्रा. डॉ. मनोहर कोरे आदी उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. खंडेराव खळदकर यांनी करून दिला. प्रा. सुरज चौगुले यांनी आभार मानले, तर प्रा. डॉ. प्रभाकर माने यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास प्राध्यापकवृंद, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा