![]() |
| क्रीडापटू श्रेया केसकर हिचा सत्कार करताना सर्व मान्यवर |
*प्रा. संदीप राजमाने : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : सातारा येथे नुकत्याच झालेल्या धनुर्विद्या विभागीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत जयसिंगपूर कॉलेजची कु. श्रेया अशोक केसकर हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय यशाच्या जोरावर तिची राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झाली असून ही स्पर्धा अमरावती येथे दि. १७ ते २० डिसेंबर २०२५ दरम्यान होणार आहे.
कु. श्रेयाला क्रीडा शिक्षिका प्रा.अमृता पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे, सचिव डॉ. महावीर अक्कोळे, पद्माकर पाटील, सन्माननीय संचालक,प्राचार्य डॉ. सुरत मांजरे, अधीक्षक संजय चावरे, उपप्राचार्य प्रा.बी. ए. आलदर, पर्यवेक्षक डॉ. महावीर बुरसे तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा