![]() |
| क्रीडा स्पर्धा उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना लेफ्टनंट सई संदीप जाधव, मेघन देसाई साहेब व अन्य मान्यवर |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : येथील अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये आज शनिवार दि. २७ रोजी वार्षिक क्रीडा स्पर्धा 'ऊर्जा' उत्साहपूर्वक सुरू झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जयसिंगपूरची कन्या लेफ्टनंट सई जाधव यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी मेघन देसाई (प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग, जयसिंगपूर) हे उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय यशस्वी विद्यार्थ्यांनी ज्योत प्रज्वलित केली, लेफ्टनंट सई जाधव यांना हस्तांतरित करण्यात आली. विद्यार्थ्यांनी मार्च पास करून मानवंदना देऊन कार्यक्रमाची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात झाली.लेफ्टनंट जाधव यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मैदानी खेळांचे महत्त्व मोबाईल गेम्सपेक्षा अधिक असल्याचे ठळक केले. त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, खेळांमधून शिस्त, संयम, आणि संघभावना विकसित होते, जे जीवनात अत्यंत आवश्यक आहे.
अधिकारी मेघन देसाई यांनी खेळामध्ये जिंकणे आणि पराजय स्वीकारण्याचे महत्त्व स्पष्ट केले आणि विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक आणि सकारात्मक वृत्ती निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास डॉ. धवलकुमार पाटील, विपिन खाडे, महावीर पाटील, डॉ. शीतल पाटील, मॅनेजर अभिजीत अडदंडे, अशोक मादनाईक, शैलेश चौगुले, निखिल इंगळे,कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे, प्राचार्या प्रिया गारोळे, समन्वयक कल्याणी अक्कोळे,शिल्पा अडदंडे, राजेश जाधव व शिक्षकवृंद उपस्थित होता.
अनेकांत स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा 'ऊर्जा' विद्यार्थी उत्साह, जोश आणि स्पर्धात्मक आत्मा वाढविण्याच्या उद्देशाने उत्साहपूर्वक सुरू आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा