Breaking

मंगळवार, ९ डिसेंबर, २०२५

*अभिरूप युवा संसदेत जयसिंगपूर कॉलेजची द्वितीय क्रमांकासह उल्लेखनीय कामगिरी*


युवक बिरादरी (भारत) आयोजीत : युवा संसद स्पर्धा,देवचंद कॉलेज, अर्जुन नगर (निपाणी)


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : व्यक्तिमत्त्व, नेतृत्व व दायित्व विकासाला चालना देण्यासाठी विभागीय पातळीवर आयोजित युवा संसद 2025-26 या प्रशिक्षणात्मक व स्पर्धात्मक अभियानात जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावत द्वितीय क्रमांक पटकावला. या कामगिरीबद्दल महाविद्यालयास 10,000 रुपयांचे रोख पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

      युवक बिरादरी (भारत) आणि देवचंद कॉलेज, अर्जुननगर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोजी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जयसिंगपूर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवून प्रभावी सादरीकरण केले.

    या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांपैकी कु. श्रेया अमोल मगदूम हिची ‘उत्तम विरोधी पक्षनेता’ म्हणून निवड झाली असून मुंबई येथे होणाऱ्या सिल्व्हर रँक स्पर्धेसाठी तिची निवड झाल्याने महाविद्यालयाचा गौरव अधिक वाढला आहे.

  संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे, सचिव डॉ. महावीर अक्कोळे व सर्व पदाधिकारी,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे व अधीक्षक संजय चावरे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले.सदर स्पर्धेत विद्यार्थ्यांना राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. खंडेराव खळदकर, प्रा. सुरज चौगुले, प्रा. सत्यजित माने व प्रा. गणेश कुरले यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

1 टिप्पणी: