Breaking

शुक्रवार, १६ जानेवारी, २०२६

*आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई : निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे यांची माहिती*

 

 निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे, शिरोळ तहसीलदार अनिल कुमार हेळकर व अन्य अधिकारी 


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


शिरोळ :  तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक कालावधीत सर्व उमेदवार, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. या काळात आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे यांनी दिली. याप्रसंगी शिरोळ तहसीलदार अनिलकुमार हेळकर व गट विकास अधिकारी परीट उपस्थित होते.

     जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयाचे प्रमुख अधिकारी, विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांची बैठक गुरुवारी येथील प्रशासकीय मध्यवर्ती कार्यालयात संपन्न झाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने माहिती देत असताना म्हणाल्या की जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभहोणार आहे. तहसील कार्यालयात अर्ज दाखल करण्याची प्रक्रियेसाठी सहा टेबलांवर कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आपला अर्ज तपासून घ्यावा काही त्रुटी आढळल्यास त्याची पूर्तता करावी. जिल्हा परिषद उमेदवारासाठी सात लाख ५० हजार रुपये व पंचायत समितीच्या उमेदवारासाठी पाच लाख २५ हजार रुपये खर्च मर्यादा आहे.

           निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसारित करण्यात येणाऱ्या जाहिराती अथवा व्हिडिओ हे संबंधित समितीकडून प्रमाणित करून घ्यावेत. सध्या विविध सण येत आहेत या सणाच्या माध्यमातून आचारसंहिता भंग होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले.

    यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्यासह शासकीय कार्यालयाचे प्रमुख विविध पक्षांचे पदाधिकारी होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा