| विकास सिद्धाप्पा कोळी, सहकारभूषण एस. के. पाटील कॉलेज, कुरुंदवाड |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक *
कुरुंदवाड : येथील सहकारभूषण एस. के. पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाचा विद्यार्थी कु. विकास सिद्धप्पा कोळी याची दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथसंचलनासाठी निवड करण्यात आली आहे.
मुंबई येथे आयोजित या भव्य प्रजासत्ताक दिन सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल, मुख्यमंत्री तसेच विविध विभागांचे उच्चपदस्थ अधिकारी व मान्यवर प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या पथसंचलनात महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय सेवा योजना संघामध्ये शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे प्रतिनिधित्व करण्याचा मान विकास कोळी याला मिळाला आहे.
विकास कोळी याने पथसंचलनातील उत्कृष्ट शिस्त, वर्ड ऑफ कमांडवरील प्रभुत्व तसेच सांस्कृतिक कला प्रकारातील उल्लेखनीय योगदान या निकषांवर आपली गुणवत्ता सिद्ध केल्याने त्याची निवड करण्यात आली आहे.
शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी प्र.कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे व राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक डॉ. टी. एम. चौगले यांचे नेतृत्व व प्रेरणा मिळाली. त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विजय पाटील, संस्थेचे सन्माननीय सदस्य तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. श्रद्धा कोठावळे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. विशाल मून व प्रा. डॉ. वृषाली मिणचेकर यांचे विशेष मार्गदर्शन त्याला लाभले.
विकास कोळी याच्या या निवडीमुळे महाविद्यालय, NSS विभाग तसेच कुरुंदवाड परिसरात आनंदाचे वातावरण असून सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा