![]() |
| शासकीय चित्रकला ग्रेड स्पर्धेत विद्यार्थ्यांचा यशाचा दबदबा |
प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक
जयसिंगपूर : दि न्यू एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर संचलित लक्ष्मीनारायण मालू हायस्कूल, जयसिंगपूरने शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा (एलिमेंटरी व इंटरमिजिएट) २०२५–२६ मध्ये अभूतपूर्व यश संपादन केले आहे. या परीक्षेसाठी एकूण ११८ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे.
एलिमेंटरी परीक्षेसाठी ६८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यामध्ये १४ विद्यार्थ्यांनी अ श्रेणी, २२ विद्यार्थ्यांनी ब श्रेणी तर ३२ विद्यार्थ्यांनी क श्रेणी मिळवली. इंटरमिजिएट परीक्षेत ५० विद्यार्थी प्रविष्ट असून ११ विद्यार्थ्यांनी अ श्रेणी, १५ विद्यार्थ्यांनी ब श्रेणी तर ३४ विद्यार्थ्यांनी क श्रेणी प्राप्त केली.
या घवघवीत यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांना कला शिक्षक श्री. संजय सुतार यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक श्री. सयाजीराव पाटील व पर्यवेक्षक श्री. सतीश चिपरीकर यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच चेअरमन मा. राजेंद्र मालू व स्कूल कमिटी सदस्यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा