Breaking

सोमवार, ५ जानेवारी, २०२६

शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी प्रा.संजय ठिगळे यांची बिनविरोध निवड


प्रा. संजय ठिगळे,(सांगली) सुयेक, अध्यक्षपदी निवड 


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


 कोल्हापूर  :  भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील माजी अर्थशास्त्र विभाग प्रमुख व मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी सदस्य प्रा. संजय ठिगळे यांची शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशनच्या (सुयेक) अध्यक्षपदी निवड झाली आहे. सुयेकचे ३६ वे वार्षिक अधिवेशन सातारा जिल्ह्यातील देऊर येथील प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालयात संपन्न झाले. सुयेकच्या सर्वसाधारण सभेत प्रा. संजय ठिगळे यांची अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. 

      अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बोलताना प्रा. संजय ठिगळे म्हणाले की, गेली ३५ वर्षे अर्थशास्त्र विषयाचा अधिव्याख्याता, अभ्यासक,लेखक आणि संशोधक म्हणून कार्य केल्याची पोहचपावती म्हणून अध्यक्ष होण्याची नामी संधी मिळाली असून अध्यक्षपदाच्या काळात अनेक महाविद्यालये,स्वयंसेवी संस्था, त्याचबरोबर अनेक वित्तीय संस्थांशी सामंजस्य करार करून विविध ठिकाणी विविध विषयावर चर्चासत्रे, परिषदा, कार्यशाळा आणि परिसंवादाचे आयोजन करण्यात येणार असून अर्थशास्त्रीय संशोधनाला चालना देण्याबरोबरच आर्थिक आणि डिजिटल साक्षरतेवर भर देण्यात येईल. 

       अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रा. संजय ठिगळे यांचे सुयेकचे आजी-माजी अध्यक्ष,कार्यकारिणी सदस्य त्याचबरोबर भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह आ. डॉ. विश्वजीत कदम, सहकार्यवाह डॉ. एम. एस. सगरे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी, जेष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर त्याचबरोबर आर्थिक, सामाजिक शैक्षणिक आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा