ओंकार कुलकर्णी यांनी डिसेंबर २०२५ मध्ये रसायनशास्त्र विषयात शिवाजी विद्यापीठातुन Ph.D मिळवली आहे. त्यांचा Ph.D चा विषय हा 'ऊर्जा साठवण अनुप्रयोगांसाठी धातू-सेंद्रिय संरचना (Metal-Organic Frameworks) आणि त्यांच्या नॅनो-संमिश्रांचे विद्युत-रासायनिक अध्ययन' आहे.
(Title of my Thesis: An Electrochemical Study of Metal-Organic Frameworks and Their Nano composites for Energy Storage Applications)
डॉ. ओंकार यांनी प्रा. संजय कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपली Ph.D पूर्ण केली.
डॉ. ओंकार यांनी अंत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून हे यश मिळवलं आहे. शिवाजी विद्यापीठाच्या कमवा व शिका योजनेत काम करत करत त्यांनी आपलं पदव्युत्तर शिक्षण घेतलं. दुसऱ्याच वर्षी पुढे Ph.D साठी प्रवेश मिळवला. यासाठी विद्यापीठाकडून Dr. ओंकार यांना गोल्डन ज्युबली रिसर्च शिष्यवृत्ती (Golden Jubilee Research Fellowship) मिळाली.
आपल्या Ph.D काळात त्यांच्या 4 वर्षामध्ये 4 शोधपत्रिका मानांकित आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये प्रकाशित झालेल्या आहेत.
माझे वडील शेती करतात आणि आई घरकाम करते. माझा मोठा भाऊ स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहे. आईवडील, शिवाजी विद्यापीठातील डॉ. आप्पासाहेब पवार कमवा व शिका योजना व मार्गदर्शक शिक्षक, मित्र यांच्यामुळेच मी हे यश संपादन करू शकलो. त्या सर्वांचे आभार.डॉ. ओंकार कुलकर्णी.
प्रामाणिक, मनमिळावू व स्वभावाने शांत अशा आपल्या मुलाने व मित्राने मिळवलेलं यश पाहून कुटुंबीय व मित्रपरिवार खुप खुश आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा