![]() |
| कॉलेजमध्ये मकर संक्रांत निमित्त तिळगुळ वाटप करताना मान्यवर |
*प्रा. गणेश कुरले : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : येथील जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर मध्ये मकर संक्रातीनिमित्त कॉलेजच्या वतीने तिळगुळ वाटपाचा व भूगोल दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी अशोक शिरगुप्पे यांनी मकर संक्रांतीनिमित्त सणाचे सांस्कृतिक महत्त्व विशद केले.१४ जानेवारी हा भूगोल दिन असून पर्यवेक्षक डॉ. महावीर बुरसे यांनी भूगोल दिनाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, पर्यावरणीय जबाबदारी आणि जागतिक समज विकसित करण्यासाठी प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले.
स्वागत व प्रास्ताविक डॉ.प्राचार्य सुरत मांजरे यांनी केले.सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रभाकर माने यांनी केले तर आभार प्रदर्शन माने यांनी मानले.या कार्यक्रमास बाळासाहेब इंगळे, बिपीन खाडे, प्रा.डॉ. स्मिता महाजन, प्रा. डॉ. विजयमाला चौगुले, प्रा. डॉ. मनिषा काळे, प्रा. डॉ. बाळासाहेब सरगर, प्रा.डॉ. सुपर्णा संसुद्धी,डॉ. एस. आर. नकाते,प्राध्यापकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा