![]() |
| घोरपडे नाट्यगृहाच्या बाहेर रस्त्यावर भरलेले अन्नाची पाकिटे |
*आनंद धातुंडे : विशेष प्रतिनिधी*
इचलकरंजी : जिल्हा परिषद व पंचायत समितीनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमात अन्नाची मोठी नासाडी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. येथील घोरपडे नाट्यगृहाच्या बाहेर जेवणाची ताटे आणि शिल्लक अन्न उघड्यावर फेकून दिल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी शुक्रवारी घोरपडे नाट्यगृहात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्मचाऱ्यांच्या भोजनासाठी प्रशासनाकडून जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, प्रशिक्षण संपल्यानंतर सुमारे ३० ते ३५ जेवणाची ताटे अन्नासह रस्त्यावर फेकून देण्यात आल्याचे दिसून आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा