Breaking

रविवार, २५ जानेवारी, २०२६

*जयसिंगपूर कॉलेजमध्ये राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा*

 

 राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शपथ घेताना 


*प्रा. डॉ. महावीर बुरसे  : उपसंपादक*


जयसिंगपूर : येथील जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर येथे राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

     यावेळी प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत राष्ट्रीय मतदार दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. मतदान हा लोकशाहीचा मजबूत पाया असून प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावणे ही सामाजिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी वैयक्तिक पातळीवर तसेच प्रबोधनात्मक रॅलीच्या माध्यमातून समाजात मतदानाबाबत जनजागृती करण्याचे आवाहन केले.

    कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रभाकर माने यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय मतदार प्रतिज्ञा देऊन मतदानाबाबत जागरूक राहण्याचा संकल्प करून घेतला.

    या कार्यक्रमास कार्यक्रम अधिकारी डॉ. खंडेराव खळदकर, उपप्राचार्य प्रा. डॉ. विजयमाला चौगुले, अधीक्षक संजय चावरे, पर्यवेक्षक डॉ. महावीर बुरसे, प्रा. सत्यजित माने व अग्रजा कांबळे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा