| सदिच्छा समारंभात मार्गदर्शन प्रेरक वक्ते अहिंशू घोष, पर्यवेक्षक डॉ. महावीर बुरसे व प्राध्यापकवृंद |
*प्रा. डॉ. महावीर बुरसे : उपसंपादक*
जयसिंगपूर : विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात आई-वडील व गुरुरुपी शिक्षक यांच्याप्रती नेहमी ऋणी राहिले पाहिजे, असे मत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व युनिव्हर्सल एज्युकेशन, बंगळूरू येथील प्रशिक्षण प्रमुख अहिंशू घोष यांनी व्यक्त केले.
ते येथील जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर येथे बुधवार, दिनांक २१ जानेवारी रोजी बारावी आर्टस् व कॉमर्स शाखेच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभात बोलत होते.
मार्गदर्शन करताना मा.घोष पुढे म्हणाले,आयुष्यात स्पष्ट ध्येय निश्चित करून त्यादृष्टीने सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक असून एखादे कौशल्य आत्मसात केल्यास ते जीवनाच्या उभारणीसाठी निश्चितच उपयोगी ठरते.याप्रसंगी कोमल घोष यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना पुढील आयुष्यात केवळ चूल-मूल इतक्यापुरते मर्यादित न राहता आपल्या विविध कलागुणांचा विकास करावा, असे आवाहन केले.
वैष्णवी काटकर, रक्षिता हडपद, तनुश्री कुलकर्णी, सानिया बागवान व प्रिया हेगांणा या विद्यार्थिनींनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
स्वागत व प्रास्ताविक पर्यवेक्षक डॉ. महावीर बुरसे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रा. बी. ए. पाटील यांनी करून दिली. सूत्रसंचालन प्रा.अंजना चावरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सुनिल चौगुले यांनी केले.
या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी प्रा. शीतल पाटील, प्रा.सुशांत पाटील, प्रा.एस. व्ही. बस्तवाडे, प्रा. ए. जे. पवार,प्रा. ए. ए. पाटील, प्रा.व्ही. ए. बडबडे तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा