Breaking

गुरुवार, २२ जानेवारी, २०२६

*जयसिंगपूर पोलिसांची यशस्वी कामगिरी ; २० गहाळ अँड्रॉइड मोबाईल मूळ मालकांना परत*

 

 पोलीस निरीक्षक सत्यवान हाके व गहाळ झालेला मुद्देमाल अँड्रॉइड मोबाईलसह गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी 


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर :  पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आठवडा बाजार व इतर गर्दीच्या ठिकाणांवरून गहाळ झालेल्या विविध कंपन्यांच्या एकूण २ लाख ५० हजार रुपये किमतीच्या २० अँड्रॉइड मोबाईल फोनचा शोध लावून ते मूळ मालकांना परत देण्यात जयसिंगपूर पोलिसांना यश आले आहे.

     पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील अंमलदार ताहिर मुल्ला, रहिमान शेख, बाळासाहेब गुत्ते कोळी तसेच सायबर पोलीस ठाण्याकडील अमर अडसुळे यांनी संयुक्तपणे तपास केला. तक्रारदारांनी दिलेल्या आयएमईआय क्रमांकाच्या आधारे सातत्यपूर्ण पाठपुरावा करत जयसिंगपूर शहरासह कोल्हापूर, सांगली, सोलापूर तसेच कर्नाटक राज्यात तपास करण्यात आला.या तपासादरम्यान गहाळ मोबाईल वापरत असलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन एकूण २० अँड्रॉइड मोबाईल हस्तगत करण्यात आले. 

     बुधवार, दिनांक २१ रोजी सकाळी ११.३० वाजता जयसिंगपूर पोलीस ठाण्यात मूळ मालकांना बोलावून आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या हस्ते सदर मोबाईल फोन मालकांना परत देण्यात आले.

      या उल्लेखनीय कामगिरीमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून जयसिंगपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा