![]() |
| फूड फेस्टिवल उद्घाटन समारंभ प्रा. आप्पासो भगाटे, डॉ. महावीर अक्कोळे, अशोक शिरगुप्पे, प्राचार्य डॉ.सुरत मांजरे व अन्य मान्यवर |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : येथील जयसिंगपूर कॉलेजमध्ये फूड सायन्स व क्वॉलिटी कंट्रोल विभागाच्या वतीने ऑरगॅनिक रोज व कॉस्मेटिक प्रॉडक्ट चे उद्घाटन फूड फेस्टिवल कार्यक्रमात करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. महावीर अक्कोळे व अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरत मांजर होते.
याप्रसंगी संस्था सदस्य प्रा.भगाटे म्हणाले की, खाद्य परंपरा व सांस्कृतिक वारसा जपण्याच्या दृष्टीने फूड फेस्टिवलचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. याच उद्देशाने फूड सायन्स विभागाच्या माध्यमातून आयोजित फूड फेस्टिवलद्वारे पारंपरिक, स्थानिक व पौष्टिक खाद्यसंस्कृती जपण्याचे महत्त्वाचे कार्य केले जात असल्याबाबत त्यांनी गौरवउद्गार काढले.
अशोक शिरगुप्पे यांनी या फेस्टिवलमध्ये विविध प्रदेशांतील पारंपरिक पदार्थ, त्यांची निर्मिती प्रक्रिया, पौष्टिक मूल्ये व आरोग्यदायी पैलू या बाबींचे कौतुक केले. यावेळी विद्यार्थ्यांनी पोस्टर सादरीकरण केले.
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. मांजरे म्हणाले, स्थानिक धान्य, पारंपारिक पाककृती आणि नैसर्गिक घटकांवर आधारित खाद्यपदार्थांना विशेष प्राधान्य देण्यात आल्याने हा महोत्सव समस्त घटकांची काळजी घेणारा आहे. या उपक्रमामुळे खाद्यसंस्कृतीचे जतन व संवर्धन होण्यास निश्चितच हातभार लागेल.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक फूड सायन्स विभाग प्रमुख प्रा. उमेश खराडे यांनी केले. आभार प्रियांका माने यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रभाकर माने यांनी केले.
या कार्यक्रमास इंगळे, बिपीन खाडे, निखिल पाटील, प्रा.डॉ. स्मिता महाजन, प्रा. डॉ. विजयमाला चौगुले, प्रा. डॉ. मनिषा काळे,प्रा. डॉ. बाळासाहेब सरगर,प्रा.डॉ. सुपर्णा संसुद्धी, पर्यवेक्षक डॉ. महावीर बुरसे, या विभागाचे समन्वयक डॉ. सचिन पाटील, प्रा. संकेत सणगर, प्रा.कु.काळे, प्राध्यापकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा