Breaking

बुधवार, १४ जानेवारी, २०२६

*विद्यापीठात १६ जानेवारी रोजी ‘प्रा. एन. डी. पाटील स्मृती दिनानिमित्त लोकचळवळ अध्यासनाच्या वतीने व्याख्यान*


प्रा. डॉ. एन.डी. पाटील स्मृती व्याख्यान 

*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील डॉ. एन. डी. पाटील लोकचळवळ अध्यासनाच्या वतीने डॉ. एन. डी. पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त शुक्रवार दि. १६ जानेवारी २०२६ रोजी ‘प्रा. एन. डी. पाटीलः विचारविश्व आणि प्रबोधन’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानामध्ये ‘प्रा. एन. डी. पाटीलः विचारविश्व आणि प्रबोधन’ या विषयावर मा. प्रसाद कुलकर्णी (इचलकरंजी) मांडणी करणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष  विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे असणार आहेत. 

    हा कार्यक्रम मराठी अधिविभाग,शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर या ठिकाणी सकाळी ११.०० वाजता सुरू होणार आहे. तरी सर्वांनी या व्याख्यानासाठी उपस्थित रहावे असे आवाहन डॉ.एन.डी. पाटील लोकचळवळ अध्यासनाचे समन्मयक प्रा.डॉ. रणधीर शिंदे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा