![]() |
| उद्घाटन सोहळ्यात मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे डॉ. महावीर अक्कोळे, प्राचार्य डॉ.सुरत मांजरे, दै. पुढारीचे संतोष बामणे, निर्भीड पत्रकार रोहित जाधव व प्रा. डॉ. विजयमाला चौगुले |
*रफिया रांगोळे : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : येथील जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर मध्ये अर्थशास्त्र विभागाच्या वतीने कर्मवीर कौशल्य केंद्रांतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन’ या कोर्सचा उद्घाटन सोहळा गुरुवार, दि. 8 जानेवारी 2025 रोजी संपन्न झाला.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. महावीर अक्कोळे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य प्रो. सुरत मांजरे,प्रा. डॉ. व्ही. व्ही. चौगुले, पत्रकार संतोष बामणे व रोहित जाधव उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना डॉ. महावीर अक्कोळे यांनी पत्रकारितेतील सत्यता व नैतिक मूल्यांचे महत्त्व विशद केले. पत्रकारिता हा व्यवसाय नसून समाजाप्रती असलेला धर्म आहे. पत्रकारांनी लोकशाहीतील समता, बंधुभाव जपत तंत्रज्ञानाचा योग्य वापर करावा, असे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.सुरत मांजरे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांच्यात विविध कौशल्ये निर्माण करण्यासाठी महाविद्यालयात असे उपयुक्त कोर्स सुरू करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी या कोर्सचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
दैनिक पुढारीचे शिरोळ तालुका प्रतिनिधी संतोष बामणे, साप्ताहिक निर्भीड महाराष्ट्रचे संपादक रोहित जाधव, मानव्य विद्याशाखा प्रमुख प्रो.डॉ.विजयमाला चौगुले तसेच कोर्स समन्वयक डॉ. प्रभाकर माने यांनी पत्रकारिता व माध्यम क्षेत्रातील संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कु. शुभांगी कुंभार यांनी केले. पाहुण्यांचा परिचय कु. निकिता शहापुरे, आभार कु. गीतांजली जाधव यांनी मानले. सूत्रसंचालन कु. रफिया रांगोळे व कु. अंजली माळी यांनी केले. याप्रसंगी पत्रकारिता कोर्स चे असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा