![]() |
| नशाबंदी रॅली, जयसिंगपूर |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक *
*राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून नशामुक्तीचा संदेश*
जयसिंगपूर : येथील जयसिंगपूर पोलीस ठाणे व जयसिंगपूर कॉलेज राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात नशाबंदी रॅलीचे आयोजन करण्यात आले. समाजात वाढत असलेल्या व्यसनाधीनतेविरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने ही रॅली उत्साहात पार पडली.
प्रारंभी संस्थेचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे व प्राचार्य डॉ.सुरत मांजरे यांनी नशाबंदी या विषयावर मार्गदर्शन केले. समापन कार्यक्रमात पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनीही आपल्या मार्गदर्शनातून नशामुक्त समाजासाठी आवाहन केले. त्यांच्या उपस्थितीत रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली जयसिंगपूर कॉलेज–क्रांती चौक–गांधी चौक असा मार्ग पार करून रॅलीचे समापन जयसिंगपूर पोलीस ठाण्याजवळ करण्यात आले.
या रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थिनींचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. विद्यार्थ्यांनी हातात नशाबंदीविषयक संदेश असलेले फलक घेत प्रबोधनात्मक घोषणा दिल्या. “नशामुक्त समाज झालाच पाहिजे” आणि “दारू सोडा – जीवन जोडा” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. या उपक्रमात जयसिंगपूर पोलीस दलाचाही सक्रिय सहभाग लाभला.
राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक डॉ. तानाजी चौगले व यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रभाकर माने, डॉ. खंडेराव खळदकर यांनी ही रॅली पूर्ण केली. प्रा. डॉ. विजयमाला चौगुले, प्रा. डॉ. तुषार घाटगे, डॉ. एस. आर. नकाते, डॉ. महावीर बुरसे, अन्य प्राध्यापकवृंद, पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा