![]() |
| जयसिंगपूर कॉलेजच्या १८ विद्यार्थ्यांचे घवघवीत यश |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : येथील जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूरच्या राष्ट्रीय छात्र सेना (NCC) विभागातील तब्बल १८ विद्यार्थ्यांची भारतीय सैन्य दलात अग्निवीर जवान म्हणून निवड झाली असून ही बाब कॉलेजसह संपूर्ण जयसिंगपूर शहरासाठी अभिमानास्पद ठरली आहे.
कठोर शारीरिक चाचण्या, लेखी परीक्षा व वैद्यकीय तपासणी या निकषांना सामोरे जात या विद्यार्थ्यांनी यशाच्या माध्यमातून देशसेवेची संधी मिळवली आहे. शिस्त, देशभक्ती, नेतृत्वगुण आणि शारीरिक तंदुरुस्ती यांचे संस्कार एन.सी.सी. प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये रुजवले जात आहेत.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे, सचिव डॉ. महावीर अक्कोळे व संस्थेचे सन्माननीय सदस्य यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
यासाठी प्राचार्य डॉ. सुरत मांजरे व एन.सी.सी अधिकारी लेफ्टनंट प्रा. सुशांत पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन व विशेष सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा