![]() |
| ओंकार ज्ञानेश्वर माने, NSS जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे दि. १७ ते २४ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ‘आव्हान’ राज्यस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना (NSS) शिबिरासाठी जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूरचा एन.एस.एस स्वयंसेवक विद्यार्थी ओंकार ज्ञानेश्वर माने ची शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर संघातून निवड झाली आहे.
या राज्यस्तरीय शिबिरामध्ये आपत्तीपूर्व व्यवस्थापन (Disaster Preparedness) विषयावर सखोल प्रशिक्षण दिले जाणार असून, आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध आधुनिक पद्धती, प्रत्यक्ष कृती व कार्यशाळांचा समावेश असणार आहे.
या निवडीसाठी ओंकार माने यास शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक डॉ. तानाजी चौगले, संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे, सचिव डॉ. महावीर अक्कोळे तसेच प्राचार्या डॉ. सुरत मांजरे यांचे मोलाचे प्रेरणादायी सहकार्य लाभले. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रभाकर माने व डॉ. खंडेराव खळदकर यांचे मार्गदर्शन मिळाले.
या महत्त्वपूर्ण शिबिरासाठी झालेल्या निवडीमुळे ओंकार माने च्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा