![]() |
| वार्षिक पारितोषिक वितरण प्रदान करताना मान्यवर |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
यशस्वी होण्यासाठी जिद्द चिकाटी सातत्य राखावे- मा.हर्षवर्धन फडणीस
जयसिंगपूर : येथील दि न्यू एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर संचलित लक्ष्मीनारायण मालू हायस्कूल, जयसिंगपूर प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. हर्षवर्धन फडणीस, प्रेसिडेंट- रोटरी ग्रीन सिटी ट्रस्ट ,जयसिंगपूर व मा. मिलिंद साखरपे, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर हे उपस्थित होते.शैक्षणिक वर्ष 25- 26 मधील शैक्षणिक गुणवत्ता, कला, क्रीडा, सांस्कृतिक व स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कूल कमिटीचे अध्यक्ष मा.राजेंद्र मालू होते.स्वागत व प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.सयाजीराव पाटील यांनी केले. यावेळी वर्षभरातील सर्व कार्यक्रमांचा थोडक्यात आढावा घेतला.प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले.
प्रमुख पाहुणे मा.हर्षवर्धन फडणीस यांनी विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी, सातत्य यांचे पालन करावे व विद्यार्थ्यांनी सामर्थ्यवान, पराक्रमी, कर्तृत्वान बनण्याचे आवाहन केले. मा.मिलिंद साखरपे यांनी आपल्या मार्गदर्शनात छत्रपती शिवाजी महाराजांचे दाखले देत आपल्या क्षेत्रात झोकून देण्याचे, संकटाला न घाबरण्याचे व संघर्षाला हसत हसत सामोरे जाण्याचे आवाहन करीत भविष्यामध्ये सक्षम होण्याचे आवाहन केले.अध्यक्षीय भाषणात मा. राजेंद्र मालू यांनी अपयशाने मनात भीती न बाळगता आत्मविश्वासाने संघर्षाला सामोरे जाण्याचे आवाहन केले. वर्षभरामध्ये झालेल्या विविध स्पर्धेमध्ये पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली.यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार मा. राजेंद्र मालू यांच्या हस्ते बुके,शाल ,फेटा व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.
जयसिंगपूर नगर पालिकेमधील नवनिर्वाचित नगरसेवक श्री.पराग पाटील,श्री.पंकज गुरव, श्री.लक्ष्मण गोसावी,सौ.शकुंतला मछले, सौ.अनिता कोळेकर , सौ.अर्चना आडगाणे , सौ.सुमैय्या कडबी, सौ.लता गाडेकर ,श्री.संजय पाटील कोथळीकर यांचा सत्कार मा.मालू साहेब यांच्या हस्ते शाल, फेटा व बुके देऊन करण्यात आला.
यावेळी मा.फडणीस साहेब यांच्या हस्ते रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मा.मिलींद साखरपे यांच्या हस्ते करण्यात आले व मा.मालू साहेब यांच्या हस्ते कला प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
माजी मुख्याध्यापक श्री.टी.डी.सुरवसे, माजी शिक्षक श्री.एस.एस.कांबळे,श्री.एस.एस.भोसले, श्री.विश्वास देवाळे (गुड मॉर्निंग ग्रुप),श्री.शशिकांत कांबळे, मुरगुंडे आऊ यांनी शाळेसाठी रोख देणगी जाहीर केली.
पाहुण्यांचा परिचय एनसीसी प्रमुख श्री.सतीश भोसले यांनी करून दिला.पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे यादी वाचन जिमखाना प्रमुख श्री.सुनील हजारे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.तेजश्री गायकवाड, कु.तनिष्का हत्तळगे, सौ.एस.एम.माळी व श्री.शांतिसागर पाटील यांनी केले.
आभार प्रदर्शन पर्यवेक्षक श्री.सतीश चिपरीकर यांनी केले.कार्यक्रमासाठी रामकृष्ण प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री.सुनील कोळी, स्कूल कमिटी सदस्य मा.चंद्रकांत जाधव (बापू) व शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य व पालक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा