![]() |
| विशेष श्रमसंस्कार शिबिरात मार्गदर्शन करताना डॉ. महावीर |
*प्रा.गणेश कुरले : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : ऊर्जा, वाहतूक, शेती व शहरीकरण क्षेत्रातील बदलांमुळे भविष्यात कार्बन फूटप्रिंट ही संकल्पना पर्यावरण संरक्षणासाठी निर्णायक ठरणार असल्याचे प्रतिपादन पर्यावरण अभ्यासक डॉ. महावीर बुरसे यांनी केले.
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व जयसिंगपूर कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मौजे धरणगुत्ती येथे आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिरात “पर्यावरण व शाश्वत विकास” या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. खळदकर होते.
डॉ. बुरसे यांनी कार्बन क्रेडिट व कार्बन फूटप्रिंटच्या वाढत्या महत्त्वावर प्रकाश टाकत दैनंदिन जीवनातून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाचे मोजमाप भविष्यात अनिवार्य ठरणार असल्याचे सांगितले. यासाठी कार्बन फूटप्रिंट कॅल्क्युलेटरचा वापर होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. खळदकर यांनी शेती क्षेत्रात कार्बन क्रेडिटमधून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या संभाव्य आर्थिक लाभाविषयी माहिती दिली.
स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. प्रभाकर माने व पाहुण्यांची ओळख निलोफर नदाफ यांनी करून दिली. सूत्रसंचालन देवश्री जाधव व आभार तन्मय पोतदार यांनी मानले. प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
यावेळी एन.एस.एस. समिती सदस्य प्रा. सत्यजित माने, प्रा. गणेश कुरले,दादासो पाटील,एन.एस.एस. प्रतिनिधी अग्रजा कांबळे, रोहन लाले व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा