Breaking

शनिवार, ३१ जानेवारी, २०२६

*एन.एस.एस च्या वतीने मतदान जनजागृतीसाठी धरणगुत्ती येथे  प्रबोधन रॅली संपन्न*

 

 मतदान जनजागृती प्रबोधन रॅली


प्रा. डॉ. महावीर बुरसे : उपसंपादक*


धरणगुत्ती (ता. शिरोळ) :  जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी शिरोळ तहसील कार्यालयाच्या वतीने मौजे धरणगुत्ती येथे प्रभावी प्रबोधन रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.

    या रॅली मध्ये शिरोळ तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, ग्रामपंचायत धरणगुत्तीचे कर्मचारी तसेच जयसिंगपूर कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी गावातील प्रत्येक घराला प्रत्यक्ष भेट देत मतदानाचा हक्क बजावण्याचे महत्त्व नागरिकांना समजावून सांगितले.

     “लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येक मत महत्वाचे आहे”, “मतदान करा – देश घडवा” अशा घोषणा देत रॅलीने संपूर्ण गावात जनजागृतीचा संदेश पोहोचवला. नागरिकांनीही या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला. या उपक्रमामुळे गावात निवडणुकीबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

     या रॅलीस एन एस एस चे संचालक डॉ.टी.एम.चौगले, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांचे मार्गदर्शन व प्रेरणा मिळाली. त्याचबरोबर  ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत केंबळे, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रभाकर माने व खंडेराव खळदकर, प्रा. गणेश कुरले, रोहन लाले व अग्रजा कांबळे यांनी विशेष सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा