| विशेष श्रमसंस्कार शिबिरात मार्गदर्शन करताना डॉ. महावीर अक्कोळे, प्राचार्य डॉ. मांजरे, प्रा. डॉ. विजयमाला चौगुले व अन्य मान्यवर |
*प्रा. डॉ. महावीर बुरसे : उपसंपादक*
जयसिंगपूर : भारतीय संविधानातील मूल्यांनुसार समाजहिताचे कार्य करणारे राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक हे देशातील स्वच्छता, सामाजिक जागृती व परिवर्तन चळवळीचे खरे शिलेदार असल्याचे प्रतिपादन संस्थेचे सचिव व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. महावीर अक्कोळे यांनी केले.
ते शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व जयसिंगपूर कॉलेज राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने मौजे धरणगुत्ती येथे आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन सत्रात बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरत मांजरे होते.
डॉ. अक्कोळे पुढे म्हणाले की, एनएसएसच्या माध्यमातून विद्यार्थ्यां मध्ये समाजभान, स्वच्छतेची जाणीव, शिस्त व राष्ट्रसेवा यांचे संस्कार रुजतात. ग्रामीण भागातील समस्या समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याची संधी या शिबिरातून मिळते.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. सुरत मांजरे म्हणाले, एनएसएसचे विद्यार्थी हे राष्ट्रीय सेवेचे पाईक असून त्यांनी या श्रमसंस्कार शिबिराचा लाभ घेऊन व्यक्तिमत्त्व विकास साधावा. याप्रसंगी प्रा.डॉ.विजयमाला चौगुले यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम अधिकारी डॉ. खंडेराव खळदकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आभार इंगवले यांनी मानले. सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. प्रभाकर माने यांनी केले.
या कार्यक्रमास प्रा. गणेश कुरले, प्रा. सत्यजित माने, प्रा. मुळे, प्रा. गुरव, एनएसएस प्रतिनिधी अग्रजा कांबळे, रोहन लाले, प्राध्यापकवृंद, स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा