Breaking

रविवार, २५ जानेवारी, २०२६

*जयसिंगपूरमध्ये मतदान अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न*


 प्रथम प्रशिक्षणा वेळी उपस्थित केंद्राध्यक्ष व अधिकारी 


 
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : लोकशाही व्यवस्थेत मतदान प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत व विश्वासार्ह पार पाडणे अत्यंत आवश्यक असून त्यासाठी प्रशिक्षित निवडणूक अधिकारी व कर्मचारी महत्त्वाची भूमिका बजावतात, असे प्रतिपादन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी ( भू संपादन) मा. अर्चना नष्टे यांनी केले.

    ते जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रशिक्षण शिबिराच्या पार्श्वभूमीवर सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृहात आयोजित प्रथम निवडणूक प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या.

प्रथम प्रशिक्षण वेळी नायब तहसीलदार विनय कौलवकर, उपस्थित केंद्राध्यक्ष व कर्मचारी 

      यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मा. अनिलकुमार हेळकर, नायब तहसीलदार विनय कौलवकर, नायब तहसीलदार (निवासी) क्रांती पाटील तसेच नायब तहसीलदार भिसे उपस्थित होते.

           मार्गदर्शन करताना नायब तहसीलदार विनय कौलवकर  म्हणाले की, नियुक्त मतदान अधिकारी व कर्मचारी यांनी या प्रशिक्षणाचा पूर्ण लाभ घेऊन निवडणूक प्रक्रिया अचूक व जबाबदारीने पार पाडावी. प्रशिक्षणार्थींनी प्रक्रियेशी संबंधित शंका विचारून निरसन करून घ्यावे तसेच तांत्रिक बाबींचे सखोल ज्ञान आत्मसात करावे.

   या प्रशिक्षण शिबिरात पहिल्या व दुसऱ्या सत्रात निवडणूक प्रक्रियेची सविस्तर माहिती देण्यात आली असून प्रत्यक्ष Handson ट्रेनिंगद्वारे मतदान यंत्र हाताळणी, प्रक्रिया व्यवस्थापन याबाबत प्रात्यक्षिके घेण्यात आली.

     जय हिंद न्यूज नेटवर्कशी बोलताना प्रशिक्षणार्थींनी सांगितले की, सदर कार्यशाळा अत्यंत उपयुक्त असून प्रश्नांचे समाधानकारक निराकरण करण्यात आले. या प्रशिक्षणामुळे ही निवडणूक प्रक्रिया आत्मविश्वासाने हाताळता येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा