![]() |
| प्रा. स्नेहल शीतल चौगुले, जयसिंगपूर |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतंर्गत जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूरच्या प्रा.स्नेहल शीतल चौगुले यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी. पदवी संपादन केली. त्यांनी "महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) यांच्या कार्यकारी कार्यक्षमतेचा, कोल्हापूर जिल्ह्याच्या विशेष संदर्भात अभ्यास" करीत आहेत. हे संशोधन मार्गदर्शक प्राचार्य डॉ. जी. जे. फगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. यासाठी डॉ. के. व्ही. मारुळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. महाजन यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
तसेच संस्थेचे चेअरमन डॉ. सुभाष अडदंडे, सचिव डॉ. सुभाष अडदंडे, संस्थेचे सर्व पदाधिकारी व प्राचार्य डॉ.सुरत मांजरे यांचे विशेष सहकार्य लाभले.
डॉ.स्नेहल चौगुले या शांत, मितभाषी आणि संयमी स्वभावाच्या असल्याने गेल्या पंधरा वर्षांहून अधिक काळ वाणिज्य शाखेत प्राध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांनी आपली शैक्षणिक सेवा अत्यंत प्रामाणिकपणे बजावली आहे. अध्यापन हे केवळ नोकरी न मानता विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडवण्याचे प्रभावी माध्यम मानणारे डॉ. चौगुले अनेक विद्यार्थ्यांच्या यशस्वी भवितव्याचे शिल्पकार ठरले आहेत.विद्यार्थी, सहकारी प्राध्यापक आणि प्रशासन यांच्याशी असलेले त्यांचे सौहार्दपूर्ण व वैचारिक नाते हे त्यांच्या कार्यपद्धतीचे वैशिष्ट्य आहे. अकाउंट हा त्यांचा मूळ विषय असून त्यांच्या सुलभ, उदाहरणाधारित आणि व्यावहारिक अध्यापनामुळे सीए, सीएस तसेच बँकिंग परीक्षांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे.
नवीन शैक्षणिक प्रयोग करण्याची त्यांची ओढ विशेष उल्लेखनीय आहे. वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या कुवतीनुसार स्टॉक मार्केट गेम, प्रात्यक्षिके आणि केस स्टडीज यांचा वापर करून अध्यापन अधिक परिणामकारक केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शेअर बाजाराविषयी जाणीव निर्माण होऊन त्यांना जबाबदार व विचारशील गुंतवणूकदार बनवण्याचे व्यासपीठ निर्माण होत आहे.
संशोधन क्षेत्रातही डॉ. चौगुले यांचे योगदान मोलाचे आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीने संशोधन पेपर लेखन व सादरीकरण, स्थानिक व समकालीन विषयांवर संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये प्रकाशित झालेल्या असंख्य संशोधन निबंधांमुळे त्यांची संशोधक म्हणून वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांवरील उत्तम प्रभुत्वामुळे त्यांचे अध्यापन उच्च दर्जाचे ठरते. यासोबतच ते उत्तम निवेदक, सूत्रसंचालक व प्रभावी वक्ते म्हणूनही परिचित आहेत. कला व सांस्कृतिक जाणिवा असलेल्या डॉ. चौगुले विद्यार्थ्यांना सांस्कृतिक चळवळीत सहभागी करून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात.संवेदनशील वृत्तीमुळे समाजातील प्रत्येक घटकाला त्यांच्या क्षमतेनुसार मदत करण्याचा त्यांचा प्रयत्न उल्लेखनीय आहे. शिक्षण, संशोधन, संस्कृती आणि समाजभान यांचा समतोल साधणारे हे व्यक्तिमत्त्व आदर्श प्राध्यापक म्हणून ओळखले जाते.
अशा या प्रामाणिक, अभ्यासू, नवोन्मेषी व संशोधक डॉ.स्नेहल चौगुले यांना वाणिज्य शाखेत पीएच.डी. पदवी प्राप्त झाल्याबद्दल शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा