Breaking

बुधवार, ७ जानेवारी, २०२६

*रेझिंग डे निमित्त अनेकांत स्कूल व जयसिंगपूर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची जयसिंगपूर पोलीस ठाण्यास भेट*



 अनेकांत स्कूल व राष्ट्रीय सेवा योजना विभाग जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर यांची पोलीस ठाण्यास भेट 


*श्रेया संकपाळ : विशेष प्रतिनिधी*


जयसिंगपूर : येथील अनेकांत एज्युकेशन सोसायटी संचलित अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व जयसिंगपूर कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एन.एस.एस.) स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी ‘पोलीस रेझिंग डे’ निमित्त जयसिंगपूर पोलीस ठाण्यास शैक्षणिक भेट दिली. या भेटीचा उद्देश पोलीस ठाण्याची दैनंदिन कार्यपद्धती, गुन्हा नोंदणी प्रक्रिया तसेच आधुनिक पोलीस यंत्रणेची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून मिळवून देणे हा होता.

  जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा. सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. सुरुवातीस ठाणे अंमलदार पक्षाची माहिती घेतली. स्वतः सत्यवान हाके यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून ‘रेझिंग डे’चे महत्त्व सांगून एफ.आय.आर. नोंदणी, गुन्हा दाखल करण्याची नवीन ऑनलाईन पद्धत तसेच त्वरित तक्रार प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली.

    यानंतर पोलीस कर्मचारी  कोळी मॅडम यांनी बारनिशी कक्षाची माहिती दिली व पोलीस कर्मचारी पाटील यांनी पोलीस वॉकी-टॉकीचे कार्य, संदेशवहन पद्धत याचे प्रात्यक्षिक सादर केले. विद्यार्थ्यांनीही वॉकी टॉकीचा अनुभव घेतला. गोपनीय विभागातील मुल्ला यांनी पोलीस ठाण्यातील अंतर्गत कामकाजाची माहिती देत प्रत्यक्ष उदाहरणांद्वारे विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले. तसेच  यांनी पुरुष व महिला पोलीस कोठडीची माहिती देऊन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे समाधान केले.

    चंदर बन्ने यांनी पोलीस ठाण्यातील विविध प्रकारची हत्यारे, रायफल्स, बुलेट्स, हातकड्या यांची माहिती देण्यात आली. पंचनाम्याच्या वेळी पुरावा म्हणून वापरल्या जाणाऱ्या साधनांची नोंद, त्यांची जपणूक व न्यायालयात सादरीकरणाची प्रक्रिया याबाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी अन्य पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

   कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रभाकर माने यांनी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले. या प्रसंगी कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. के. डी. खळदकर,प्रा. सुरज चौगुले, प्रा. मेहबूब मुजावर, प्रा. विश्रांती चव्हाण, प्रा. ज्योती चोपडे-पोरे, प्रा. गणेश कुरले तसेच अनेकांत  स्कूलचे विद्यार्थी, एन.एस.एस.चे स्वयंसेवक व पत्रकारितेचे  विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर उपक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक डॉ. टी. एम. चौगले  संस्थेचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे व कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे व मुख्याध्यापिका प्रिया गारोळे यांनी विद्यार्थ्यांना विशेष प्रोत्साहन दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा