Breaking

बुधवार, ४ फेब्रुवारी, २०२६

*वाढदिवसाला वृक्षारोपण : डॉ. किरण पाटील यांचा पर्यावरणपूरक आदर्श उपक्रम*

 

 वृक्षारोपण करताना डॉ. किरण पाटील व डॉ. महावीर अक्कोळे


प्रा. डॉ. प्रभाकर माने :  मुख्य संपादक*


जयसिंगपूर : येथील धन्वंतरी व सामाजिक कार्यकर्ते डॉ. किरण पाटील यांनी आपला वाढदिवस यावर्षीही समाजोपयोगी उपक्रमाने साजरा करत पर्यावरण संवर्धनाचा आदर्श निर्माण केला. जयसिंगपूर कॉलेजच्या कॅम्पसमध्ये विविध देशी जातींच्या ५७ वृक्षांचे रोपण करून त्यांनी ५७ वा वाढदिवस उत्साहात साजरा केला.

       जयसिंगपूर कॉलेजच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे चेअरमन डॉ. सुभाष अडदंडे यांच्या प्रेरणेतून “वाढदिवस वृक्षारोपणाने साजरा करावा” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली जात आहे. या प्रेरक विचाराला अनुसरून डॉ. पाटील यांनी मागील तीन वर्षांपासून आपल्या वाढदिवसाच्या वयानुसार झाडांची लागवड करण्याचा उपक्रम सातत्याने राबवला आहे. तसेच संस्थेचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे यांच्या मार्गदर्शनाखाली ते सातत्याने सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभागी असतात.

       वृक्षारोपणाच्या वेळी  अभिजीत अडदंडे, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे, प्रा. बी. ए. पाटील, प्रा.डॉ. प्रभाकर माने तसेच दहावी बॅचचे जिवलग वर्गमित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्याविषयी उपस्थित व्यक्तीनी उत्तम विचार व भावना व्यक्त केल्या. 

     डॉ. पाटील यांच्या या पर्यावरणपूरक आणि रचनात्मक कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून युवकांसाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा