Breaking

बुधवार, ४ फेब्रुवारी, २०२६

शिरोळ तहसील व जयसिंगपूर कॉलेजच्या वतीने उदगाव येथे मतदान जनजागृती रॅली उत्साहात संपन्न

 

 उदगाव येथे मतदान जनजागृती रॅली


प्रा. डॉ. प्रभाकर माने :  मुख्य संपादक*


जयसिंगपूर : जिल्हा परिषद व शिरोळ पंचायत समिती निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी शिरोळ तहसील कार्यालय व जयसिंगपूर कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने मौजे उदगाव येथे भव्य मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.

   शिरोळचे तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी  अनिलकुमार हेळकर यांची प्रेरणा व मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या रॅलीत NSS स्वयंसेवकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. “मतदान करा, देश घडवा”, “एक मत – मजबूत लोकशाही”, “लोकशाहीचा उत्सव – मतदानाचा हक्क” अशा घोषणा देत स्वयंसेवकांनी परिसरात जनजागृती केली. यावेळी विद्यार्थ्यांच्या हातामध्ये जनजागृती करणारे हात फलक होते. विशेष म्हणजे यामध्ये विद्यार्थिनींनी सक्रिय सहभाग नोंदवला होता.

    रॅलीतून नागरिकांना निर्भयपणे व मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी नागरिकांशी संवाद ही साधला.लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे असल्याचा संदेश देण्यात आला. ग्रामस्थांनीही या उपक्रमाचे स्वागत करत स्वयंसेवकांचे कौतुक केले.

     एन.एस.एस चे संचालक डॉ. टी. एम. चौगले, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे, यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. यामध्ये कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रभाकर माने, डॉ.खंडेराव खळदकर व रोहन लाले यांचे विशेष सहकार्य लाभले.

     या उपक्रमामुळे मतदारांमध्ये जागरूकता वाढण्यास निश्चितच मदत होईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा