Breaking

शनिवार, २८ फेब्रुवारी, २०२६

*राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त जयसिंगपूर कॉलेजमध्ये रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न*


 जयसिंगपूर कॉलेजमध्ये रक्तदान शिबिर संपन्न 


*प्रा. डॉ. महावीर बुरसे : उपसंपादक*


जयसिंगपूर : येथील जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व एन.सी.सी. यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरात एकूण ४१ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. 

     कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी मार्गदर्शन करताना रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित केले. “रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून प्रत्येक व्यक्तीने नियमित रक्तदान केले पाहिजे. सध्या जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असून आपल्या रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात,” असे ते म्हणाले.

यावेळी प्रा. डॉ. स्मिता महाजन यांनी युवकांना राष्ट्रभावनेने प्रेरित होऊन रक्तदानासारख्या उपक्रमांत सहभागी होण्याचे आवाहन केले. 

    डॉ. खंडेराव खळदकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर एनसीसी अधिकारी लेफ्टनंट सुशांत पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रभाकर माने यांनी केले.


    या शिबिरासाठी  हिंदरत्न प्रकाशबापू पाटील ब्लड बँक, सांगलीचे लोंढे व दिपक पाटील यांचे सहकार्य लाभले. प्रा. गणेश कुरले, प्रा. सत्यजित माने, एनएसएस प्रतिनिधी अग्रजा कांबळे व शाहिद सय्यद तसेच एनएसएसच्या विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले.

      संस्थेचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे यांनी शिबिरस्थळी भेट देऊन रक्तदात्यांचे मनोबल वाढवले. यावेळी प्रा. डॉ. विजयमाला चौगुले, डॉ. एस. आर. नकाते, उपप्राचार्य प्रा. भारत आलदर, पर्यवेक्षक महावीर बुरसे, अधीक्षक संजय चावरे, प्रा. बी. ए. पाटील आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा