Breaking

गुरुवार, ५ मार्च, २०२६

जयसिंगपूर कॉलेजमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न

 वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. साधना पाटील, डॉ. महावीर अक्कोळे व प्राचार्य डॉ. सुरत मांजरे 


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


 जयसिंगपूर :  येथील जयसिंगपूर कॉलेजमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या विविध क्षेत्रातील गुणवत्तेचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रेरक वक्ते डॉ. साधना पाटील (ईश्वरपूर) उपस्थित होत्या, तर अध्यक्षस्थानी डॉ. सुभाष अडदंडे होते.

                प्रमुख पाहुणे डॉ. साधना पाटील यांनी विद्यार्थ्यांना व्यसनाधीनतेपासून दूर राहण्याचा मौलिक उपदेश करताना जीवनात शिस्त, परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोनाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा दिली. संस्थेचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे यांनी विद्यार्थ्यांनी गुणवत्ता व संस्कार यांचा समतोल राखून प्रगती करणे विषयी भाष्य केले.



       यावेळी विविध विभागांचा अहवाल सादर करण्यात आला. त्यामध्ये प्राध्यापक गुणवत्ता पारितोषिक  प्रा. डॉ. विजयमाला चौगुले,शैक्षणिक गुणवत्ता पारितोषिकाचा अहवाल प्रा. डॉ. बाळासाहेब सरगर, एन.एस.एस. पारितोषिकाचा अहवाल प्रा. डॉ. प्रभाकर माने, एन.सी.सी. पारितोषिकाचा अहवाल प्रा. सुशांत पाटील, सांस्कृतिक पारितोषिकाचा अहवाल डॉ. संतोष डफळापुरकर, ज्युनिअर शैक्षणिक पारितोषिक उपप्राचार्य प्रा. भारत आलदर, सीनियर क्रीडा पारितोषिकाचा अहवाल डॉ. एम. एस. सूर्यवंशी, ज्युनिअर क्रीडा पारितोषिकाचा अहवाल प्रा.अमृता पाटील यांनी सादर केला.

     प्रमुख पाहुणे डॉ. साधना पाटील व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.  

         प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. अंजना चावरे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुनील चौगुले व डॉ. सुजाता पाटील यांनी केले, तर प्रा. डॉ. प्रभाकर माने यांनी आभार मानले.

    या कार्यक्रमास संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी खजिनदार पद्माकर पाटील, अशोक शिरगुप्पे, बाळासो इंगळे,अशोक मादनाईक, आदिनाथ नरदे, बिपिन खाडे, प्रा. डॉ. स्मिता महाजन, डॉ. श्रीदेवी नकाते, पर्यवेक्षक डॉ. महावीर बुरसे, अधीक्षक संजय चावरे, प्राध्यापकवृंद, प्रशासकीय सेवक व कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा