![]() |
| संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान |
*प्रा. मेहबूब मुजावर : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : महाराष्ट्रातील लोकप्रिय व कृतीशील संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने जयसिंगपूर महाविद्यालयात स्वच्छता कार्यक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरातील भिर्डी सभागृहाजवळील परिसराची स्वच्छता करून सामाजिक बांधिलकीची जाणीव कृतीतून व्यक्त केली.
यावेळी प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी मार्गदर्शन करताना संत गाडगे महाराज यांच्या कृतीशील विचारांचा, स्वच्छतेच्या संदेशाचा तसेच अंधश्रद्धेवर प्रहार करणाऱ्या त्यांच्या कार्याचा उलगडा केला. समाज परिवर्तनासाठी प्रत्यक्ष कृतीचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रभाकर माने, डॉ. खंडेराव खळदकर, प्रा. गणेश कुरले व प्रा. सत्यजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उत्साहाने परिसर स्वच्छ केला. या उपक्रमात श्री.प्रकाशबापू पाटील ब्लड बँक सांगलीचे मा.लोंढे, मा.गवळी सर व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा