![]() |
| लक्ष्मीनारायण मालू हायस्कूल, जयसिंगपूर |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने २० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होणाऱ्या इयत्ता दहावीच्या सार्वजनिक परीक्षेसाठी येथील लक्ष्मीनारायण मालू हायस्कूल येथे बैठक व्यवस्था पूर्ण करण्यात आली असून परीक्षेकामी केंद्र सज्ज झाले आहे.
केंद्र क्रमांक ५१०३ असलेल्या या ठिकाणी २० फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान परीक्षा होणार असून F १०५३२२ ते F १०५७७१ या क्रमांकांतील विद्यार्थी प्रविष्ट आहेत.विद्यार्थ्यांसाठी स्वच्छता, पिण्याचे पाणी व प्रकाश व्यवस्था आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून परीक्षा शिस्तबद्ध व पारदर्शक वातावरणात पार पडेल, अशी माहिती केंद्रसंचालक अर्थात मुख्याध्यापक सयाजीराव पाटील यांनी दिली. विद्यार्थ्यांनी वेळेत केंद्रावर उपस्थित राहावे, तसेच पालकांनीही सहकार्य करण्याबाबतचे आवाहनही त्यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा