Breaking

शुक्रवार, २० फेब्रुवारी, २०२६

*पत्रकारितेतील बदलांचा प्रत्यक्ष अनुभव : जयसिंगपूर कॉलेज विद्यार्थ्यांची दैनिक महान कार्य कार्यालयास अभ्यास भेट*


 अभ्यास भेट प्रसंगी दैनिक महान कार्य वृत्तपत्राचे मुख्य संपादक मा. विजय पवार, कार्यकारी संपादक महेश पवार, पत्रकार संतोष बामणे व अन्य 


*प्रा. डॉ. महावीर बुरसे  : उपसंपादक*


जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटी संचलित जयसिंगपूर कॉलेज येथील जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन विभागातील विद्यार्थ्यांनी जयसिंगपूर येथील दैनिक महान कार्य, महान कार्य न्यूज चॅनेल, महान कार्य सोशल मीडिया विभाग तसेच गोदाई लक्षप्रभा प्रिटींग प्रेस येथे अभ्यास भेट देत वृत्तपत्र निर्मिती प्रक्रियेची सविस्तर माहिती घेतली.याप्रसंगी दैनिक महान कार्य वृत्तपत्राचा प्रवास ही जाणून घेतला.

        कार्यकारी संपादक महेश पवार यांनी पत्रकारिता करताना गुणवत्ता, कौशल्य आणि कायद्याच्या चौकटीचे भान ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले. सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारितेची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. तसेच साप्ताहिक महान कार्यपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपर्यंतचा प्रवास त्यांनी विद्यार्थ्यांसमोर उलगडला.या अभ्यास भेटीत विद्यार्थ्यांनी वृत्तपत्र निर्मिती, संपादन, छपाई आणि डिजिटल माध्यमातील कार्यपद्धती प्रत्यक्ष पाहून अनुभव घेतला.

    यावेळी मार्गदर्शन करताना प्रा.डॉ. प्रभाकर माने यांनी पत्रकारितेत समाजदृष्टी महत्त्वाची असल्याचे सांगितले. “जे घडते ते समाजासमोर आणण्यासाठी पत्रकारांचा पुढाकार आवश्यक असून समाजानेही अशा पत्रकारांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे,” असे त्यांनी नमूद केले.

     पत्रकार संतोष बामणे यांनी पत्रकारितेतील तांत्रिक बदलांचा आढावा घेत पोस्टापासून ते ऑनलाइन माध्यमांपर्यंत झालेल्या प्रवासाचे उदाहरण देत नव्या पिढीतील पत्रकारांनी आधुनिक साधने आत्मसात करण्याचे आवाहन केले.

    यावेळी पत्रकार आनंदा शिंगे, व्यवस्थापक शरद खिलारे, संतोष इचलकरंजीकर, इजाजखान पठाण, कृष्णात हेगाण्णा, सचिन बिरोजे, सरिता जाधव, प्रशांत वडेर, विकास अकिवाटे, सौरभ गिरमल, प्रियांका हडपद, श्रेया संकपाळ, शुभांगी कुंभार, निकीता शहापूरे, प्राजक्ता पवार, गितांजली जाधव, सोनाली साळुंखे, स्वप्नाली साळुंखे, अंजली माळी, रफिया रांगोळे, प्रतिक्षा सरवदे, निकीता कोरवी व अन्य प्रमुखांनी आपली मनोगतं व्यक्त केली. 

     सदर अभ्यास भेटीस संस्थेचे चेअरमन डॉ. सुभाष अडदंडे, सचिव डॉ.महावीर अक्कोळे, पद्माकर पाटील, प्राचार्य डॉ.सुरत मांजरे, पत्रकार रोहित जाधव यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा