![]() |
| एन.एस.एस. शिबिर समारोप सत्रात मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक सत्यवान हाके व प्राचार्य डॉ. सुरत मांजरे |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : राष्ट्रीय सेवा योजना (NSS) ही केवळ सामाजिक उपक्रमांची चळवळ नसून विद्यार्थ्यांना जबाबदार, सजग व राष्ट्रहितासाठी कार्य करणारे नागरिक घडविण्याचे प्रभावी माध्यम आहे, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी केले.
ते शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित विशेष संस्कार शिबिराच्या समारोप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी त्यांनी युवकांची राष्ट्रविकासातील भूमिका स्पष्ट करत सामाजिक शिस्त, कायदा व सुव्यवस्थेचे पालन, व्यसनमुक्ती, स्वच्छता आणि नागरिकांचे कर्तव्य याविषयी मार्गदर्शन केले. तसेच आपल्या करिअरचा अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडून प्रेरणादायी विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरत मांजरे होते. त्यांनी NSS च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव, शिस्त आणि राष्ट्रप्रेमाची भावना विकसित होते, असे नमूद केले.
या शिबिरासाठी संचालक तानाजी चौगले, सरपंच विजया कांबळे, शेखर पाटील, सर्व सदस्य व ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत केंबळे यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रभाकर माने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. गणेश कुरले यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रणाली गुरव व कोमल वरक यांनी केले, तर आभार डॉ. खंडेराव खळदकर यांनी मानले.
याप्रसंगी प्रा. सत्यजित माने, अग्रजा कांबळे, माजी NSS प्रतिनिधी रोहन लाले, सिने कलाकार विक्रांत माळी तसेच मोठ्या संख्येने NSS स्वयंसेवक विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी स्वयंसेवकांनी समाजसेवेची शपथ घेतली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा