![]() |
| औद्योगिक अभ्यास क्षेत्रभेट, ईश्वरपूर व आष्टा |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : येथील श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र व बँकिंग विभागाच्या वतीने दि. 18 फेब्रुवारी 2026 रोजी विद्यार्थिनीं साठी औद्योगिक व बँक शैक्षणिक भेट उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडली.
या अंतर्गत इस्लामपूर येथील राजाराम बापू पाटील सहकारी दूध संघ मर्यादित, इस्लामपूर येथे विद्यार्थिनींना दूध संकलन प्रक्रिया, गुणवत्तेची तपासणी, शीतकरण व पॅकेजिंग याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. दुग्ध व्यवसायातील व्यवस्थापन, उत्पादन नियोजन आणि बाजारपेठेतील स्पर्धा याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी संग्राम कदम व संतोष जाधव यांनी उद्योग व्यवस्थापनाचे विविध पैलू समजावून सांगत विद्यार्थिनींच्या शंकांचे समाधान केले.
तसेच आष्टा येथील अपना सहकारी बँक येथे विद्यार्थिनींना बँकिंग व्यवहार, कर्जप्रक्रिया, ठेवींचे प्रकार, डिजिटल बँकिंग सेवा तसेच सहकारी बँकिंगची रचना याबाबत सखोल माहिती देण्यात आली. शाखा व्यवस्थापक उमेश पै यांनी बँकेची कार्यपद्धती, आर्थिक शिस्त व ग्राहकसेवेचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले.
प्राचार्य प्रो. डॉ. विकास मिणचेकर यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले.या शैक्षणिक भेटी दरम्यान विभाग प्रमुख डॉ. संदीप रावळ, प्रा. प्रवीण नडगे, प्रा. सोमनाथ आदर्शे, प्रा. प्रज्ञा कुलकर्णी व प्रा. आर्या कुलकर्णी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा