Breaking

बुधवार, २५ फेब्रुवारी, २०२६

*जयसिंगपूर कॉलेजमध्ये चर्चासत्र संपन्न ; भारतीय अर्थव्यवस्थेच्या सर्व बाजूने विस्तृत विचारमंथन*

 

 गटचर्चा सत्रात मार्गदर्शन करताना प्रा. स्वाती बस्तवाडे, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे  व प्रा. डॉ. विजयमाला चौगुले 


 *रफिया रांगोळे : विशेष प्रतिनिधी*


जयसिंगपूर : येथील जयसिंगपूर कॉलेजमध्ये अर्थशास्त्र विभागाच्या वतीने मंगळवार दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी “भारतीय अर्थव्यवस्था : दशा व दिशा” या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्रा.स्वाती बस्तवाडे या होत्या, तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.सुरत मांजरे होते.तर प्रो. डॉ. विजयमाला चौगुले, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रो. डॉ. प्रभाकर माने व प्रा. डॉ. स्नेहल चौगुले प्रमुख उपस्थित होते.

    प्रा. स्वाती बस्तवाडे यांनी “भारतीय अर्थव्यवस्थेची दशा आणि दिशा” या विषयावर मौलिक मार्गदर्शन करताना स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील अर्थव्यवस्थेची तौलिनक मांडणी केली.स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात हस्तकला व कुटीर उद्योगांना मोठी मागणी होती; मात्र कालांतराने त्यांचा ऱ्हास झाला, असे त्यांनी नमूद केले. स्वातंत्र्यानंतर पंचवार्षिक योजनांची अंमलबजावणी, नवीन आर्थिक धोरणे व तंत्रज्ञानामुळे भारताच्या आर्थिक विकासाला चालना मिळाली आणि अर्थव्यवस्थेची प्रगती झाली, असेही त्यांनी सांगितले. कृषीप्रधान देशातून डिजिटल अर्थव्यवस्थेकडे झालेला प्रवास आणि भारतीय चलनाचे बदलते स्वरूप याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मांडणी केली.

  अध्यक्षीय भाष्य करताना प्राचार्य डॉ.सुरत मांजरे म्हणाले की, सध्याचे जग डिजिटल होत असून ई-बँकिंगचा वापर झपाट्याने वाढत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत एम फॅक्टर” चे विशेष महत्त्व अधोरेखित केले.

      विद्यार्थ्यांनी गट चर्चेमध्ये सक्रिय सहभाग नोंदवीत भारतीय अर्थव्यवस्थेच्या सकारात्मक व नकारात्मक बाजू प्रभावीपणे मांडत रोजगार, बेकारी, रुपयाची घसरण, वैश्विक स्थान  व डिजिटलायझेशन या बाबीचा विशेष उल्लेख केला.

      या कार्यक्रमास डॉ. वंदना देवकर, प्रा. मेहबूब मुजावर व प्रा. गणेश कुरले उपस्थित होते.या गटचर्चेसाठी अर्थशास्त्र विषयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   स्वागत व प्रास्ताविक प्रा. विश्रांती माने यांनी केले. पाहुण्यांचा परिचय कु. रफिया रांगोळे यांनी करून दिला. आभार प्रा. ज्योती पोरे यांनी मानले. सूत्रसंचालन कु. सुस्मिता चव्हाण व कु. पूजा कांबळे यांनी केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा