Breaking

शुक्रवार, ६ फेब्रुवारी, २०२६

*संभाजीपूरमध्ये लोकशाहीचा जागर : तहसील कार्यालय व जयसिंगपूर कॉलेजची मतदान जनजागृती रॅली उत्साहात*

 

 शिरोळ तहसील कार्यालय व राष्ट्रीय सेवा योजना

*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


 जयसिंगपूर : संभाजीपूर (ता. शिरोळ) ग्रामपंचायत परिसरात लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी शिरोळ तहसील कार्यालय व जयसिंगपूर कॉलेज राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली मतदान जनजागृती रॅली मोठ्या उत्साहात पार पडली. नागरिकांमध्ये मतदानाबाबत सजगता निर्माण करून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग वाढवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.या रॅलीस शिरोळचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांचे मार्गदर्शन लाभले. 


    रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी संभाजीपूर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात फेरफटका मारत “आपलं मत-आपली ताकद”, “मतदान हा लोकशाहीचा आत्मा आहे”, व “प्रत्येक मतातून घडतो देश” अशा प्रभावी घोषणांद्वारे नागरिकांचे प्रबोधन केले. तरुणांच्या उत्साही सहभागामुळे संपूर्ण परिसरात लोकशाहीप्रती जागृतीचे वातावरण निर्माण झाले.

    राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. टी. एम. चौगले व जयसिंगपूर कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी कार्यक्रमास विशेष सहकार्य करत उपक्रमास बळ दिले.

     राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रभाकर माने व प्रा. डॉ. खंडेराव खळदकर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. यावेळी प्रा. गणेश कुरले, प्रा. मेहबूब मुजावर, प्रा. सत्यजित माने, रोहन लाले व अग्रजा कांबळे यांनी सक्रिय सहभाग घेतला.


     उपक्रमातून मतदान ही केवळ जबाबदारी नसून प्रगल्भ लोकशाही व्यवस्था व राष्ट्रनिर्मितीची पवित्र प्रक्रिया आहे, हा ठाम संदेश समाजापर्यंत पोहोचला. नागरिकांनी कोणत्याही अमिषाला बळी पडू नये तसेच दबावाशिवाय निर्भीडपणे मतदान करून लोकशाही अधिक सक्षम करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा